रजोनिवृत्ती, रजोनिवृत्तीची लक्षणे मराठी, रजोनिवृत्ती म्हणजे काय, रजोनिवृत्ती माहिती, रजोनिवृत्तीचा काळ, रजोनिवृत्ती उपाय, रजोनिवृत्ति आयुर्वेद, रजोनिवृत्ती उपचार रजस्त्राव म्हणजेच स्त्रियांची मासिक पाळी. तिची स्त्री असण्याची खूण. तिला मातृत्व देणारी विशेष व्यवस्था.

रजोनिवृत्ती
रजोनिवृत्ती माहिती
रजोनिवृत्तीची लक्षणे

रजोनिवृत्ती व स्त्रियांमधील बदल

रजोनिवृत्ती (Menopause) साधारण वयाच्या १३-१४ व्या वर्षी मासिक पाळी सुरु होते व साधारण वयाच्या ४५ ते ५० या मध्ये ती थांबते. ही  ३० ते ३५ वर्षे नियमाने दर महिन्याला ४ ते ५ दिवस स्त्रीला मासिक धर्म होतो, ५ व्या दिवशी थांबतो.

अशी ही व्यवस्था, जी स्त्री शरीरावर आणि मनावर सुद्धा जवळजवळ ३५ वर्षे अधिराज्य गाजवत असते. तिचे शरीरातून निघून जाणे किंवा कार्य थांबणे हे नक्कीच तितकेसे सोपे नसते. जसे नोकरीमध्ये, निवृत्तीचे वय जवळ येत जाते तेव्हाच, अनेक शारीरिक आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतात, आपले मनसुद्धा खरे तर निवृत्ती स्वीकारायला तयार नसते मात्र  शेवटी तो एक दिवस,  उगवतोच आणि आपण निवृत्त होतो.

जे काम वर्षानुवर्षे आपण करत आलेलो आहोत, ते एक दिवस थांबते. तेव्हा मनाची चलबिचल होते, काय करावे ते नक्की सुचत नाही. रोजचे ठरलेले रुटीनच एकदम संपून जाते आणि काही काळ तरी एक रीकामपण आपल्याला घेरुन राहते. हळूहळू आपण त्यातून बाहेर येऊन, नव्याने पुन्हा आयुष्य मनासारखे जगायला सिध्द होतो आणि त्याचा आनंदही काही वेगळाच असतो.

स्त्रियांच्या बाबतीत होणारी रजोनिवृत्ती हे काहीशी तशीच असते. वर्षानुवर्षे स्त्री शरीराचा समतोल राखणारे घटक जेव्हा त्यांचे कार्य संपले म्हणून, निवृत्ती घेतात तेव्हा त्याचा पडसाद संपूर्ण शरीरावर उमटतो. शरीराला व मनाला त्यातून सावरायला वेळ लागतो.

साधारण रजोनिवृत्तीचा काळ हा ८ वर्षांचा धरला जातो.

एखाद्या स्त्रीची मासिक पाळी कधी जाईल हे तसे सांगणे अवघड असते. त्या स्त्रीच्या आईची पाळी ज्या काळात गेली, साधारण त्याच काळात मुलीची जाते. मात्र हे देखील एक ठोकताळा आहे.

रजोनिवृत्ती
रजोनिवृत्ती

रजोनिवृत्तीची लक्षणे / रजोनिवृत्तीची लक्षणे मराठी

चाळीशी नंतर इतके दिवस नियमित येणारी पाळी अचानक अनियमित होऊ लागते. त्या दिवसात होणाऱ्या स्त्रावाच्या प्रमाणामध्ये फरक पडतो. कधी तो अगदी कमी होतो, तर कधी नेहेमीपेक्षा जास्त जातो.

या काळात स्त्रीला थकवा जाणवतो. रोजचे काम सुद्धा कधीकधी नकोसे वाटते. अचानक वजन वाढू लागते. गुढगे दुखीचा त्रास होतो. गालांवर आणि इतर ठिकाणी त्वचेवर काळपट डाग पडू लागतात. त्वचा कोरडी व रुक्ष होते. काही स्त्रीयांना या काळात पचनाचा बराच त्रास होतो. अचानक पोट फुगते, थोडे खाल्ले तरी पोट गच्च वाटते. जास्त प्रमाणात ढेकर येतात. कधी अचानक घाम फुटतो व खूप गरम होते.    

रजोनिवृत्तीचे परिणाम

रजोनिवृत्ती हे स्त्रीच्या मनावरही खूप खोल परीणाम करते. इतके दिवस लीलया, अनेक जबाबदाऱ्या सांभाळणारी स्त्री, थोड्या जबाबदारीने घाबरते. छोट्या छोट्या गोष्टींचे तिला अनामिक खूप दडपण येते. छोट्या कारणांनी ती दुखावली जाते. अचानक रडू येते.

भावना संयमित ठेवणे कठीण जाते. संतापाचे उद्रेक होतात. अनेक वेळा असा संताप येऊन गेल्यावर स्त्रीला कळते की, हे अनावश्यक होते, मात्र तरीही त्या क्षणी तो संयम राखता येत नाही. त्यामुळे एकूणच या काळात शरीर आणि मन ढवळून निघाल्यासारखे होते.

रजोनिवृत्तीचा काळ | रजोनिवृत्ती कशी निभवावी?

सर्व प्रथम म्हणजे रजोनिवृत्तीचा हा काळ बराच असतो. सगळ्या स्त्रीयांना सर्व लक्षणे नसतात. किंबहुना सगळ्या स्त्रीयांना त्रास होतोच असेही नाही. मात्र बहुतेक जणींना काहीना काही स्वरूपात त्रास होतो. तीव्रता वेगवेगळी असते.

या काळात लक्षात ठेवण्याची प्रमुख गोष्ट म्हणजे ही “एक अवस्था” आहे, त्यामुळे काही काळाने हे सर्व त्रास संपणार आहेत हे स्त्रीने समजून घेतले पाहिजे. एकदा पाळी थांबली की, काही काळ शरीर सैरभैर होते.

कारण ज्या स्त्री विशिष्ट घटकांवर तिचे शरीर व मन चालत असते ते घटक, त्यांचे कार्य संपल्यामुळे, कमीत कमी राहतात आणि त्यांच्या शिवाय काम करण्याची शरीराला सवय करून घ्यावी लागते. थोड्या दिवसांनी ही सवय होते.

रजोनिवृत्ती चा काळ
रजोनिवृत्ती चा काळ

रजोनिवृत्ती दरम्यान घ्यावयाची खबरदारी

या काळात सर्वात महत्वाचा असतो तो योग्य आहार. सर्व रसयुक्त आणि संपूर्ण आहार घेण्याची पद्धत हल्ली खूप कमी झाली आहे. योग्य पोषण न मिळाल्यामुळे धातू विकल होतात. यासाठी रोज, भाजी, पोळी, वरण किंवा आमटी, सलाड किंवा दही न घातलेली कोशिंबीर असे पूर्ण जेवण दोन्ही वेळेस घ्यावे.

नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी हे जास्त गरजेचे. मांसाहारी असल्यास अगदी योग्य प्रमाणात घ्यावे. दही खाणे शक्यतो टाळावे. ताक चालेल. रोज एक फळ खावे मात्र मिल्कशेक टाळावेत. गोडावर नियंत्रण ठेवावे. रोज नियमित व्यायाम करावा. मोकळ्या हवेत चालावे. मनाने आनंदी राहावे. एखादा छंद जोपासावा. ज्या क्षणी काम होत नाही असे वाटेल, त्या वेळी शांतपणे, अपराधी वाटून न घेता, पूर्ण विश्रांती घ्यावी.

रजोनिवृत्ती उपचार
रजोनिवृत्ती उपचार

रजोनिवृत्ति आयुर्वेद

आयुर्वेदामध्ये या काळामध्ये घेण्यासारखी उत्तम औषधे आहेत. ती तज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावीत. पंचकर्मातील बस्ती, शिरोधारा यासारख्या चिकित्सा खूप मदत करतात.या काळात मासिक स्त्राव जास्त होणे, खूप दिवस चालू राहणे यासारख्या त्रासांवर आयुर्वेद चिकित्सा देता येते.वेळोवेळी पंचकर्म केल्यानेही वरील त्रास कमी होतात.

मासिक पाळी येणं हे जितकं नैसर्गिक आहे तितकीच मासिक पाळी जाने हेही नैसर्गिक आहे. त्यामुळे त्या काळात मन आणि शरीर दोनही सांभाळले तर मासिक पाळी पूर्ण गेली की स्त्री पुन्हा नव्या उमेदीने आयुष्य सुरू करूच शकते.

रजोनिवृत्ती उपाय | रजोनिवृत्ती उपचार

सगळ्यात शेवटचा पण महत्वाचा मुद्दा म्हणजे समुपदेशन

स्त्रीला या काळात आधाराची खूप गरज असते. तिची ही अवस्था नि त्याच वेळी वाढलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे ती दडपून जाते. पाळीची वाढलेली अनियमितता तिला कोणतेच प्रोग्रॅम्स नीट ठरवू देत नाही. सतत अनिश्चितपणा,थकवा, जमेल की नाही? अशी मनात शंका यामुळे स्त्री मनाने खूप नाजुक होते.

अशा वेळी तिला समुपदेशन म्हणजेच counselling खूप उपयोगी पडते (आपण समुपदेशनासाठी आमच्याशी संपर्क साधू शकता – आमच्याशी संपर्क साधा – येथे क्लिक करा). मुळामध्ये ही एक काही काळ राहणारी अवस्था आहे, नंतर सगळे ठीक होईल याची तिला खात्री द्यावी लागते.तिच्या तब्येतीचे पडसाद कुटुंबावर पण पडतात. कारण इतक्या वर्षात आई,पत्नी असं सतत तिच्यावर अवलंबून राहण्याची सवय झालेली असते. अशावेळी तिच्या तब्येतीचे अचानक होणारे चढ उतार, तिची बदललेली मानसिकता कुटुंबाला पण अस्वस्थ करते.

अशावेळी, संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसवून, याची कल्पना देऊन, त्यांची कशी मदत, या काळात होऊ शकेल, हे समुपदेशन, स्त्रीचा हा प्रवास नक्कीच सुसह्य करते. कुटुंबातील संवाद, आम्ही तुझ्यासोबत आहोत हे तिला सांगणं, तिची चिडचिड होऊ लागल्यास, समजून घेऊन शांत बसणे व वाद टाळणे या गोष्टी केल्यास एकूणच तिला खूप आधार वाटतो. यासाठी कुटुंबाने एकत्र येऊन एक -दोन वेळा समुपदेशन घेतले तर त्याचा कुटुंबालाही खूप फायदा होतो.      

ओजस आयुर्वेद रजोनिवृत्तीसाठी शंभर टक्के नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपचार देतात, अधिक तपशीलांसाठी आमच्याशी संपर्क साधा: येथे क्लिक करा.

व्हिडिओ - रजोनिवृत्ती - कारणे, लक्षणे आणि उपचार पर्याय

उपयुक्त टॅग

रजोनिवृत्ती, रजोनिवृत्तीची लक्षणे, रजोनिवृत्तीची लक्षणे मराठी, रजोनिवृत्ती म्हणजे काय, रजोनिवृत्ती लक्षणे, रजोनिवृत्ती माहिती, रजोनिवृत्ती चा काळ, रजोनिवृत्ती उपाय, रजोनिवृत्ति आयुर्वेद, रजोनिवृत्ती उपचार, रजोनिवृत्ती मराठी