Ayurvedic Treatment – Ojas Women Health Clinic https://ojaswomenhealthclinic.com Total Health Care Through Consulting, Panchakarma & Medicines Mon, 08 Feb 2021 03:56:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.3 https://ojaswomenhealthclinic.com/wp-content/uploads/2020/09/cropped-fav-1-32x32.png Ayurvedic Treatment – Ojas Women Health Clinic https://ojaswomenhealthclinic.com 32 32 आरोग्याचा संकल्प 2021 https://ojaswomenhealthclinic.com/arogyasankalp/ Sat, 19 Sep 2020 10:14:46 +0000 https://jioshow.com/?p=1046

या महिन्याच्या अखेरीस हे वर्षही संपेल आणि नव्या वर्षाची सुरुवात होईल आरोग्याचा संकल्प 2021. नवीन वर्षी काही संकल्प सोडला जातो. काही निश्चय केले जातात. यामध्ये आरोग्यासाठी संकल्प सोडणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे.
जसे या वर्षी मी माझे वजन एका वर्षात २० किलोने कमी करेन किंवा या वर्षी मी गोड पदार्थ अजिबात खाणार नाही किंवा या वर्षी मी प्रत्येक दिवशी व्यायाम करेन…इ.

संकल्प हा नेहेमी चांगल्या च हेतूने व प्रामाणिकपणे केला जातो. आपल्याला जी गोष्ट एरवी कितीही करू म्हटल्याने होत नाही तीच गोष्ट संकल्प सोडला की हमखास होते हि पण त्यामागची एक धारणा असते.मात्र आरोग्य विषयी संकल्प सोडताना अनेक वेळा खूप अतिरेकी निर्णय घेतले जातात. जसे वर म्हटल्या प्रमाणे एका वर्षात २० किलो वजन कमी करेन. आणि मग हा संकल्प काहीही करून पूर्ण करण्यासाठी चुकीचे डाएट केले जाते. मग कोणी फक्त फळे खाऊन राहते तर कोणी एक वेळा जेवते. कोणी फक्त जूस पिते. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हा विचार खरं तर महत्वाचा आहे.

म्हणून आरोग्यासाठी संकल्प सोडताना तो आपल्या प्रकृतीला मानवणारा, त्याचा फायदा देणारा असावा.व्यायामाचा संकल्प सोडताना आपल्या कामाचे स्वरूप, आपल्याला उपलब्ध असलेला वेळ, आपल्या शारीरिक तक्रारी हे सर्व लक्षात घ्यावे. त्यासाठी तज्ञ लोकांचे मत घेणे, त्यांच्याकडून आपल्यासाठी योग्य व्यायाम निवडून घेणे व मग त्याचा संकल्प सोडणे असे केल्यास त्याचा फायदा खूप होतो.

कोणत्याही अतिरेकी आहार नियंत्रणामुळे वजन कमी होते हा एक असाच मोठा गैरसमज आहे. उलट अशा आहाराने आरोग्याचे मोठे नुकसान होते. हल्ली तरुण पिढीमध्ये विशेषतः मुलींमध्ये, लग्न ठरण्याच्या काळात या अतिरेकी आह्रार नियंत्रणाचे प्रमाण वाढते. काहीही करून लौकरात लौक्कर सुंदर आणि सडपातळ दिसायचे असते. मात्र याचा परिणाम म्हणून चक्कर येणे, थकवा येणे, त्वचा काळवंडणे, डोळ्या खाली डार्क सर्कल येणे हे दुष्परिणाम दिसतात.त्यामुळे आरोग्याविषयी संकल्प करताना नीट विचार पूर्वक निर्णय घ्यावा कारण एकदा ठरवले की पुढचे वर्षभर आपल्याला त्या संकल्पाचे पालन करायचे असते.

आता सगळ्यांना उपयोगी पडतील, आरोग्यामध्ये भरच घालतील असे काही सोपे संकल्प —-
१) मी रोज सकाळ–संध्याकाळ १ वाटी वरण जेवणामध्ये खाईन व रोज सर्व भाज्या खाईन.
२) मी महिन्या मधून फक्त २ वेळा जंक फूड खाईन
३) मी रोज ३ की.मी. चालत जाईन.
४) मी आठवड्यातून एका दिवशी वाहन वापरणार नाही
५) मला कोणी चुकीचे संकल्प करताना दिसल्यास मी त्याला योग्य मार्ग दाखवण्यास मदत करेन.
आपल्या बरोबर थोडा समाजाचेही भान ठेवणारे हे संकल्प निश्चितच आरोग्यदायी आहेत.

]]>
थंडी गुलाबी https://ojaswomenhealthclinic.com/%e0%a4%a5%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%80/ Sat, 19 Sep 2020 10:13:54 +0000 https://jioshow.com/?p=1044

 हिवाळा सुरु झाला. थंडी पडू लागली. आपल्याला हल्ली हवामानामधील बरेच बदल सहन करावे लागत आहेत.पावसाळा बराच लांबला. आणि आता थंडी सुरु झाली.

ऋतू कोणताही असला तरी काम थांबत नाही. थंडी पडली आहे म्हणून दुलई ओढून झोपून जावे असे कितीही जरी वाटले तरी प्रत्यक्षात ते शक्य नसते. रोजचे ऑफिस.. प्रवास.. धावपळ ही चालूच राहते. मग या अशा बदललेल्या ऋतूमध्ये आपली जीवनशैली पण थोडी बदलावी लागते. तरच तो ऋतू एन्जॉय करता येतो.

सकाळी उठल्यावर आधी गरम पाणी प्यावे. अंघोळ करण्यापूर्वी अंगाला तेल लावावे. साबणाचा वापर शक्यतो टाळावा.किंवा आठवड्यातून २-३ वेळेस साबण लावावा..तोही हलका हात फिरवून. बाकी वेळी मसुराचे पीठ व दुध एकत्र करून ते वापरावे. किंवा तिळाचे कूट करून ते अंगाला लावावे.

अंगामध्ये सिंथेटिक कपडे घालणे टाळावे. निदान आतमध्ये सुती कपडे घालावेत. मोटरसायकल  वरून जाताना थर्मल कपडे घालावेत. त्यामुळे थंडी वाजत नाही. ऑफिसमध्ये जर ए.सी. असेल तर थर्मल कपडे आतून घातल्यावर चांगले संरक्षण मिळते.

या हवेमध्ये थंड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे. गरम, पातळ अन्न जसे सूप..आमटी..वरण..पातळ उसळ… असे पदार्थ जास्त घ्यावेत.

या हवेमध्ये भूक चांगली लागते. खाल्लेले अन्न पचते ही. म्हणूनच या ऋतूमध्ये खीर, शिरा असे पदार्थ खावेत. दुधी हलवा, गाजर हलवा घ्यावा.  हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू मुद्दाम  केले जातात. रोज एक लाडू खावा. दुध गरम करून थोडी हळद घालून प्यावे.

मांसाहार करण्यास हा ऋतू चांगला. त्यामुळे ज्यांना सवय आहे अशांनी आठवड्यातून एकदा मांसाहार करावा.  मात्र हे सर्व खाणे पिणे आपली पचनशक्ती बघूनच करावे. पचन चांगले नसल्यास हे पदार्थ खाऊन त्यापासून फायदा न होता उलट तोटाच होतो. यासाठीच  अति मसालेदार व तेलकट अन्न खाऊ नये. नॉन-व्हेज खाणे म्हणजे  चमचमीत रस्सा करून खाणे असे नाही. त्या ऐवजी भाजलेले किंवा सूप या स्वरूपात घेतले  तर ते जास्त आरोग्यकारक ठरते.

या हवेत आजारी पडायचे नसेल तर व्यायाम मस्ट. रोज सूर्य नमस्कार घालणे हा सर्वात उत्तम व्यायाम. जिम मध्ये व्यायामाची सवय असेल तर एकीकडे व्यायाम व एकीकडे ए.सी. चालू असे नसावे. शक्य असेल तेव्हा उन्हामध्ये चालावे.

वर सांगितलेले उपाय हे नवीन नाहीत. मात्र आपल्या हल्लीच्या जीवन शैलीमध्ये आपण ते विसरलो आहोत हे ही खरे. म्हणून या लेखातून थोडीशी आठवण केली इतकेच.

]]>
थंडीतील आहार https://ojaswomenhealthclinic.com/%e0%a4%a5%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0/ Sat, 19 Sep 2020 10:12:33 +0000 https://jioshow.com/?p=1042

हल्ली आपल्या आहारामध्ये फ्लॉवर, टोमाटो,बटाटा, कांदा या भाज्या खाण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे.त्या मानाने दोडकी, तोंडली, दुधी भोपळा, लाल भोपळा, कोहळा, वाल-पापडी,कारली, घोसावळी (गिलकी),फरजबी, अशा भाज्या कमी खाल्ल्या जातात. यांना वेली–भाज्या असे म्हणतात. कारण या भाज्यांचे वेल  असतात. त्या जमिनीत कंद या स्वरूपात न उगवता वेलावर येतात.  पचनाच्या दृष्टीने वेली  भाज्या पचायला सोप्या व हलक्या असतात. त्यामध्ये जीवनसत्वेही भरपूर असतात. मात्र चवीला त्या चटकदार नसल्याने कमी खाल्ल्या जातात.या भाज्या विविध स्वरूपात वापरून अनेक चवदार पदार्थ बनवता येतात.  त्यातील काही रेसिपीज —-

दुधी भोपळ्याचे मुटके — दुधी भोपळा, नुसती भाजी किंवा रायते किंवा गोड हलवा या स्वरुपात जास्त वापरला जातो. मुटके हा एक वेगळा प्रकार —

दुधी भोपळा किसून घ्यावा (कोवळा असेल तर साले न काढता किसावा).त्याला थोडे पाणी सुटते. त्यामध्ये मावेल इतके मुगाच्या डाळीचे पीठ घालावे. ओवा, हळद, थोडे तीळ, लाल तिखट, ४ पाकळ्या लसूण ठेचून, बारीक चिरलेली कोथिंबीर इ . घालावे.  चवीला मीठ घालावे. २  चमचे तेल गरम करून घालावे. व हे पीठ मळून घ्यावे.वरून वेगळे पाणी मळण्यासाठी वापरू नये. या घट्टसर पीठाचे हाताने मुटके वळावेत. (हाताच्या मुठीसारखे गोळे). भांड्याला तळाशी थोडे तेल लावून वर हे मुटके ठेवून कुकरमध्ये शिट्टी न लावता १५ मिनिटे वाफवून घ्यावेत. वाफ गेल्यावर कुकर मधून बाहेर काढावेत. थोडे मोकळे करून घ्यावेत  त्यावर तेल, मोहोरी, हिंग, लाल मिरची व कढीपत्ता अशी खमंग फोडणी द्यावी व खावेत. चटपटीत लागतात. त्यामुळे मुलेही आवडीने खातात. या पदार्थामध्ये दुधी भोपळा व मुग दाल हे दोन्ही पौष्टिक पदार्थ भरपूर खाल्ले जातात. मुलांना डब्यामध्येही  देता येतात.

त्याबरोबर चटणी— १ कांदा पातळ उभा चिरून घ्यावा. १ मुठ भाजलेले शेंगदाणे, लाल तिखट,मीठ,थोडे चिंचेचे कोळून पाणी व साखर किंवा गुळ घालून मिक्सर मधून पातळसर चटणी करावी. ही  चटणी मुटक्यानबरोबर खायला छान लागते.

]]>
थंडीतील काही खास पदार्थ https://ojaswomenhealthclinic.com/%e0%a4%a5%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5/ Sat, 19 Sep 2020 10:11:48 +0000 https://jioshow.com/?p=1040

गाजर — हल्ली वर्षभर गाजर मिळते. एरवी मिळणारी गाजरे केशरी रंगाची असतात. तीही चांगली, मात्र त्याला स्वाद नसल्याने फारशी वापरली जात नाहीत. थंडीमध्ये लाल-गुलाबी गाजरे येतात. ती खायला मधुर चवीची असतात. रसाळ असतात. त्यामुळे ती अनेक प्रकारे वापरता येतात.आपल्या आहारामधेही गाजर नियमित पणे  खाणे  आवश्यक आहे. गाजर थोडेसे पित्तकर आहे.मात्र थोड्या प्रमाणात कोवळे गाजर घेण्यास काहीच हरकत नाही.

गाजराचे परोठे — १ वाटी गाजराचा कीस. त्यामध्ये थोडे तीळ,ओवा,हळद, तिखट,मीठ, घालावे. कोथिंबीर बारीक चिरून घालावी. हे सर्व एकत्र मिसळून घ्यावे. त्याला थोडे पाणी सुटते. त्यामध्येच मावेल इतकी कणिक घालावी. चमचाभर तांदूळ पिठी घालावी. २ चमचे तेल घालून पीठ चांगले मळून घ्यावे. त्याचे छोटे परोठे लाटून भाजावेत. त्यावर पांढरे लोणी पसरून लावावे. खायला अतिशय चविष्ट लागतात व पोटभर होतात.

गाजराची कोशिंबीर — १ गाजर किसून घ्यावे. ते थोडेसे वाफवून घ्यावे. त्यामध्ये १ कांदा बारीक चिरून घालावा. १ चमचा दाण्याचे कूट किंवा ओला नारळ घालावा. कोथिंबीर चिरून घालावी. मीठ व १ चिमुट साखर घालून वरून लिंबू पिळावे. हि कोशिंबीर खूप रंगीबेरंगी दिसते. लहान मुलेही आवडीने खातात.

गाजर हलवा — हा सगळ्यात प्रिय असा पदार्थ थंडीत घरोघरी केला जातो. गाजर किसून घ्यावे. २ वाट्या गाजर कीस घ्यावा. थोडे पाणी व दुध भांड्याच्या तळाशी घालून त्यावर कीस घालून वाफवून घ्यावा. त्यामध्ये पाउण वाटी साखर घालावी. चागली हलवून मिक्स करावी व ते मिश्रण जरा कोरडे होईपर्यंत हलवत राहावे. ५० ग्राम खवा वेगळ्या कढई मध्ये मंद आचेवर परतून घ्यावा. तो खवा कीसामध्ये घालावा.परत चांगले परतून घ्यावे. सर्व मिश्रण एकजीव झाले की वेलची पूड घालावी. हलवावे. वरून बदाम काप घालावेत.

हलवा मधुर, बलदायक व पौष्टिक आहे.पचावयास थोडा जड असल्याने एका वेळी थोडा खावा.

]]>